ताज्या घडामोडी

पार्थ पवार फाउंडेशन तर्फे सोमाटणे येथे अन्नधान्य वाटप

तळेगाव दाभाडे : पवार फाउंडेशन तळेगाव तर्फे सोमाटणे, चौराई नगर येथील सध्या घरीच  आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 25 कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती संतोष भेगडे यांनी दिली,  गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जगात थैमान घातल्याने अनेक लोकांचे रोजचे काम कमी झाले, काहींचे बंदच पडले, त्यामुळे जवळची बचत संपली आणि रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.ही गोष्ट पार्थ पवार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना समजली व आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी हे काम हाती घेतले आणि  गेल्या दीड वर्षात सुमारे 4 ते साडेचार हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले.  सोमाटणे चौराई नगर या भागात वासुदेव समाजाचे काही लोक आहेत आणि सध्या त्यांचे गावोगा फिरणे बंद असल्याने त्यांची रोजच्या जेवणाची सुद्धा मारामार होत असल्याने तळेगाव नगरपालिका सदस्य संतोष भेगडे यांनी या सर्व कुटुंबाना गहु, तांदूळ, साखर,तेल, डाळ, मीठ, चहा पावडर, हळद, साबण,मसाला,भाजी,रक्तवाढीच्या गोळ्या, सॅनिटायझर,मास्क असे एक महिनाभर पुरेल एव्हडे किराणा आणि आरोग्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोहोच केले.  

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!