ताज्या घडामोडी

कुंडमळ्यावरील बंधारा बनतोय मृत्यूचा सापळा

मावळ :तालुक्यातील कुंडमळा येथील बंधारा मृत्यूचा सापळा बनत आहे. या बंधाऱ्यावरून स्थानिकांची सर्रास ये-जा सुरू आहे. अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या या बंधा-यावरून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. चारचाकी वाहनांसह रिक्षा, जेसीबी ही सर्रास बंधा-याचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.

बंधाऱ्याच्या आसपास जंगली वनस्पती व जलपर्णी मोठ्या प्रमाणात उगवली आहे.तसेच बंधाऱ्याला आवश्यक असणारा संरक्षक कठडा नसल्याने यावरून होणारी वाहतूक ही धोकादायक पद्धतीने सुरू आहे.पर्यटन बंदी असतानाही कुंडमळा वर पर्यटकांची गर्दी दिसते. रहदारी साठी आवश्यक असणारे कोणतेही मार्गदर्शक सूचना फलक येथे लावण्यात आलेले नाहीत.

वास्तविक नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध असतानाही केवळ कमी वेळात पोहोचण्यासाठी नागरिक या शॉर्टकट रस्त्याचा वापर करून आपल्या जीवावर उदार होताना दिसतात.याठिकाणी संरक्षक भिंत किंवा कठडा बांधावा, मार्गदर्शक सूचना फलक लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!