ताज्या घडामोडी

रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटीचा ५ वा पदग्रहण सोहळा

तळेगाव दाभाडे :येथील रोटरी क्लब सारखेच युवकांसाठी असेलल्या रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे ५ वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. रोटरी वर्ष २०२१-२२ साठी रो. आकाश गाडे पाटील ची अध्यक्ष पदी तसेच रो. अक्षता सोनकांबळे हीची सचिव पद स्वीकारले.

या कार्यक्रम मध्ये श्री. सचिन चपळगावकर, टीव्ही ९ मराठी चे वार्ताहर व रो. श्री. संतोष शेळके, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच रोट्रॅक्ट district ३१३१ चे डी. आर. आर. रो. पार्थ जावकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

यावेळी रो. पार्थ जावकर ने नवीन अध्यक्ष आणि सचिव यांना क्लब च वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि या वर्षी रोट्रॅक्टर्स ना त्यांचा रोट्रॅक्ट क्लब च आपल्या व्यवसायिक/औद्योगिक वाटचाली मध्ये कसा उपयोगी ठरतो याचे मार्गदर्शन केले. तर श्री. सचिन चपळगावकर यांनी समाज मध्ये सध्याचा काळात सामाजिक बांधिलकी मधून रोटरी आणि रोट्रॅक्ट क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

या सोहळ्या साठी रोटरी चे रो. दीपक फल्ले रो. राजेश गाडे पाटील, रो. विलास काळोखे, रो. दिलीप पारेख, रो. सुरेश धोत्रे, रो. शाहीन शेख, रो. रेश्मा फडतरे तसेच रोट्रॅक्ट क्लब चे रो. प्रतिक माने, रो. अवधूत साळुंखे, रो. अजिंक्य कसबी, रो. कौस्तुभ केळकर, रो. अथर्व कदम, हे उपस्थित होते.

या सोहळ्याचे सूत्र संचलन रो. अपूर्वा पिंपळखरे आणि रो. वैष्णवी अंबिकर ह्यांनी केले. रो. वैभव तनपुरे आणि रो. प्रतिक मेहता यांनी या कार्यक्रमचे सूत्रधार म्हणून काम पाहिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!