ताज्या घडामोडी

एमआयटी कॉलेजमध्ये भरलेल्या दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पहिला दिवस संपन्न.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती मावळ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ, आणि एमआयटी ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

एमआयटी कॉलेजमध्ये भरलेल्या दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पहिला दिवस संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १० जानेवारी.

दिनांक ९/०१/२०२३ आणि १०/०१/२०२३ रोजी होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती मावळ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ, आणि एमआयटी ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय सुधीर भागवत सर गटविकास अधिकारी पंचायत समिती मावळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी सुदाम वाळुंज, शिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष प्रसाद गायकवाड, विठ्ठल माळशिकारे अध्यक्ष मावळ तालुका मुख्याध्यापक संघ,  विनोद साळवे प्राचार्य एमआयटी ज्युनिअर कॉलेज, प्रदर्शन समन्वयक कपिल खंदारे, सुरेश सुतार अध्यक्ष मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ, वसंत बुरांडे तालुका समन्वयक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने झाली, तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम याप्रसंगी करण्यात आले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ६१  हून अधिक शाळांनी आपला सहभाग दर्शवला. आज वक्तृत्व स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यासाठी ही उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवण्यात आला. हे विज्ञान प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विना शुल्क आहे.

निरनिराळ्या करीअरच्या संबंधित माहिती  या ठिकाणी मिळत आहे. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन प्राचार्य विनोद साळवे यांनी केला आहे. दिनांक १०/०१/२०२३ रोजी विज्ञान प्रदर्शन तसेच प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी ची वेळ ९ ते २ इतकी राहील. तसेच बक्षीस वितरण समारंभाची वेळ ३ ते ४:३० इतकी राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!