ताज्या घडामोडी

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तळेगाव मधील शिक्षक डॉ. संकेत पोंक्षे यांच्या ‘गंधशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन..

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे प्रसाद प्रकाशन पुणे, यांचा अमृत महोत्सवी सांगता समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तळेगाव मधील शिक्षक डॉ. संकेत पोंक्षे यांच्या ‘गंधशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १० जानेवारी.

रविवार (दि. 8) रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे प्रसाद प्रकाशन पुणे, यांचा अमृत महोत्सवी सांगता समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. अतिशय भव्य आणि दिमाखदार झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार आणि डेक्कन कॉलेज अभित विद्यापीठ पुणे, यांचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर हे उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये प्रसाद प्रकाशनाच्या ‘आपली शास्त्र संपदा’ या मालिकेतील डॉ. संकेत पोंक्षे यांच्या ‘गंधशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी डॉ. पोंक्षे यांना भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. डॉ. संकेत पोंक्षे हे ‘एम. ए.’ च्या परीक्षेत संस्कृत विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आलेले असून दोन सुवर्णपदकांचे मानकरी राहिलेले आहेत.

तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘Gandhasara – An Ancient Indian Science Of Perfumes and Cosmetics’ हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यांचा गंधशास्त्राचा व्यासंग मोठा आहे. आपल्या प्राचीन भारतामध्ये अनेक शास्त्रे आणि विज्ञान परंपरा उदयाला आलेल्या होत्या आणि विकसितही झाल्या होत्या.

त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधांची, सुगंधी पदार्थांची नैसर्गिक घटकद्रव्ये वापरून निर्मिती करण्याचे शास्त्र म्हणजेच गंधशास्त्र होय. या विषयावर आधारित एक माहितीपूर्ण साहित्य म्हणजे ‘शास्त्रग्रंथ’ असे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. संकेत पोंक्षे हे गेली 15 वर्षे तळेगाव दाभाडे येथिल सुप्रसिद्ध रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन येथे संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी निवडलेल्या या अनोख्या आणि अपरिचित विषयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!