ताज्या घडामोडी

लसीकरणाचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी – पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

पिंपरी चिंचवड :लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतलेल्या कष्टकऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना पिंपरी-चिंचवड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन सुरू झाले. हळूहळू लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला. लोकल सेवा बंद झाली. यामुळे खाजगी नोकरदार व रोजंदारीवर काम करणारे यांच्या पुढे नोकरी करण्याचा व टिकवण्याचा प्रश्न उभा राहिला.

लोकल सेवा बंद झाल्यामुळे खाजगी, असंघटित कामगार प्रवासी भरडला जाऊन त्याची नोकरी सुटण्याची वेळ आली आहे .तुटपुंज्या पगारात घरखर्च भागवत असताना जाण्या-येण्यासाठी अधिकचा खर्च करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यामुळे लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतले असतील अशा व्यक्तींना आवश्यक त्या कागदपत्रांची योग्य ती तपासणी करून लोकल प्रवासाची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे कष्टक-यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात निवेदनाव्दारे संघटनेने केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!