ताज्या घडामोडी

देवलेतील श्री काळभैरवनाथ याञेनिमित्त भजनस्पर्धेत कुसगाव बुद्रूक व ताजेमधील संघाना प्रथम क्रमांक..

ता.६ रोजी " आवाज महाराष्ट्राचा " हा आॕर्केस्ट्रा मायाताई खुटेगावकर यांचा होणार आहे..

देवलेतील श्री काळभैरवनाथ याञेनिमित्त भजनस्पर्धेत कुसगाव बुद्रूक व ताजेमधील संघाना प्रथम क्रमांक .

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ४ जानेवारी.

देवलेतील श्री काळभैरवनाथ याञेनिमित्त भजनस्पर्धेत कुसगाव बुद्रूक व ताजेमधील संघाना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.ता.३ सकाळी दहा ते दोन ग्रामस्थ व कार्ल्यातील पोलिस पाटील संजय जाधव यांच्या दोन कन्या यांचे भजन झाले. रोजी दुपारी भजनस्पर्धा संपन्न झाल्या.

यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस कुसगाव बुद्रूक येथील श्री भैरवनाथ भजनी मंडळाने व ताजे येथील ताजुबाई बाल भजनी मंडळाने पटकावले.
दुसरा क्रमांक श्री जाखमाता महिला भजनी मंडळ , सदापूर आणि श्री गोधनेश्वर प्रासादिक भजनी मंडळ , राजमाची यांना विभागून देण्यात आला.
तिसरा क्रमांक श्री विठ्ठल रूक्मिणी भजनी मंडळ , सदापूर आणि श्री माऊली भजनी मंडळ , वाकसई यांना विभागून देण्यात आला.
चौथा क्रमांक स्वामी विवेकानंद भजनी मंडळ , पाटण आणि श्री नवनाथ भजनी मंडळ , मुंढावरे यांना विभागून देण्यात आला .पाचवा क्रमांक श्री प्राथमिक शाळा भजनी मंडळ , ताजे यांना देण्यात आला.यावेळी उत्कृष्ट गायक म्हणून वसंत मुंगशे , कुसगाव बुद्रूक , दुसरा क्रमांक कु.वैष्णवी केदारी , ताजे आणि गायक संतोष शिंदे यांना देण्यात आला.

मृदूंगमणी चा पुरस्कार वेदांत घारे , सदापूर , दुसरा क्रमांक ओम केदारी , ताजे आणि संदिप घारे , सदापूर यांना देण्यात आला.यावेळी बक्षीस वितरण देवलेतील सरपंच , उपसरपंच , सदस्या , सदस्य व देणगीदार यांचे हस्ते देण्यात आले.
स्वागत व सूञसंचालन कामगारनेते बबनराव आंबेकर यांनी केले.यावेळी सरपंच.वंदना आंबेकर व चेअरमन बाळासाहेब आंबेकर यांनी प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस दिले होते.सदस्या आशाताई एकनाथ आंबेकर यांचेतर्फे सर्व क्रमांकाला श्री विठ्ठल रूक्मिणी मुरूती दिल्या होत्या..यावेळी सरपंच , उपसरपंच , आजी माजी सदस्य यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. परिक्षक म्हणून हार्मोनियम विशारद देवरामबुवा येवले , मृदूंगाचार्य संतोषबुवा घनवट ,तबला व टाळसाठी ह.भ.प.आमोल घनवट यांनी परिक्षण केले. सुमारे नऊ संघ या स्पर्धेत आले होते.
ता.२ रोजी ह.भ.प.गणेशमहाराज गोणते यांचे राञी ७ ते ९ कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
ता.५ रोजी श्री काळभैरवनाथ देवाच्या पालखी प्रदक्षीणेचा कार्यक्रम आसून ता.६ रोजी ” आवाज महाराष्ट्राचा ” हा आॕर्केस्ट्रा मायाताई खुटेगावकर यांचा होणार आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!