ताज्या घडामोडी

भाजप तर्फे कसबा विधानसभेसाठी हेमंत रासने ;तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आश्विनीताई जगताप या उमेदवारांची नावे जाहीर..

भाजप तर्फे कसबा विधानसभेसाठी हेमंत रासने ;तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आश्विनीताई जगताप या उमेदवारांची नावे जाहीर..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी ४  जानेवारी.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने कसबा विधानसभेसाठी हेमंत नारायण रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अश्विनीताई लक्ष्मणराव जगताप या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीने  केंद्रीय निवडणूक समितीने होणाऱ्या महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीतील रिक्त जागांसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.२०५ विधानसभा कसबा हेमंत रासने आणि चिचवड मतदारसंघासाठी माजी आमदार कै.लक्ष्मणराव जगताप यांच्या पत्नी आश्विनीताई जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे मुख्यालयातील प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव अरूणसिंह यांनी ही नावे जाहीर केली आहे..
कसबा विधानपरिषदेच्या मतदारसंघातील आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधनामुळे ही जागा रिकामी झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघामधे आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या  निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
त्यामुळे या दोन्ही मतदारसंघामधे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!