ताज्या घडामोडी

अक्कलकोट निवासी “श्री स्वामी समर्थ पादुका परिक्रमा तळेगाव दाभाडे येथे उत्साहात संपन्न.

१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता जिजामाता चौक येथे आगमन झाले . पालखीचे स्वागत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. बापूसाहेब भेगडे व ह्या वर्षीचे अध्यक्ष. महेश भोपळे यांनी केले.

अध्यात्मिक :  अक्कलकोट निवासी “श्री स्वामी समर्थ पादुका परिक्रमा तळेगाव दाभाडे येथे उत्साहात संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ फेब्रुवारी.

“श्री स्वामी१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता जिजामाता चौक येथे आगमन झाले . पालखीचे स्वागत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. बापूसाहेब भेगडे व ह्या वर्षीचे अध्यक्ष. महेश भोपळे यांनी केले. समर्थ पादुका परिक्रमा अक्कलकोट येथून निघून सहा महिन्यांनी परत अक्कलकोट येथे जाते, त्या परिक्रमेमध्ये तळेगाव येथे गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता जिजामाता चौक येथे आगमन झाले . पालखीचे स्वागत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. बापूसाहेब भेगडे व ह्या वर्षीचे अध्यक्ष. महेश भोपळे यांनी केले.

पालखी मिरवणुकीने विठ्ठल मंदिर येथे आली पालखी आल्यानंतर स्वामींच्या पादुकांवरती पाच नवदांपत्यांच्या हस्ते रुद्र अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन केले होते त्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

त्यानंतर पालखी व स्वामींची मूर्ती छान सजवलेल्या रथामधून ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली ज्या स्वामीभक्तांना अक्कलकोट येथे जाणे शक्य होत नाही अशा सर्व स्वामी भक्तांसाठी
आपण ग्राम प्रदक्षिणेचे आयोजन करतो. यावर्षी प्रचंड उत्साहात सगळीकडे पालखीचे स्वागत करून स्वामींचे दर्शन घेतले.पालखी मुक्कामी विठ्ठल मंदिर येथे आली व रात्रीची आरती होऊन सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळी म्हणजेच शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी नऊ वाजता पालखी पुढील प्रस्तानासाठी निघाली वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अथांग परिश्रमातन पार पडले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!