ताज्या घडामोडी

नूतन महाविद्यालय तळेगाव येथे “निर्भय कन्या अभियान” कार्यशाळेचे आयोजन..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एक दिवसीय निर्भय कन्या अभियान या विद्यार्थिनी साठी कार्यशाळेचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते.

नूतन महाविद्यालय तळेगाव येथे “निर्भय कन्या अभियान” कार्यशाळेचे आयोजन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १७ फेब्रुवारी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एक दिवसीय निर्भय कन्या अभियान या विद्यार्थिनी साठी कार्यशाळेचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर लीना नारायण कवितके . प्राजक्ता जनार्दन धाप्ते सब इन्स्पेक्टर तळेगाव पोलीस स्टेशन व प्राध्यापक वंदना केमसे महाविद्यालयाचे जेष्ठ सभासद. सोनबा गोपाळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास देवतारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक जावेद शेख आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

पोलीस सब इन्स्पेक्टर प्राजक्ता धाप्ते यांनी विद्यार्थिनींना दामिनी पथका बद्दल माहिती देऊन तसेच कोणाचाही अत्याचार सहन न करणे, दक्ष राहणे, विद्यार्थिनींनी सोशल मीडियापासून लांब राहणे, चुकीच्या गोष्टी न करणे याबद्दल मार्गदर्शन केले.

डॉक्टर लीना कवितके यांनी विद्यार्थिनींना रोजच्या दिनक्रम बद्दल तसेच दिवसाची सुरुवात योगा, सूर्यनमस्कार किंवा व्यायामाने केल्यास दिवसभर शारीरिक किंवा बौद्धिक कामांमध्ये ऊर्जा मिळते तसेच आरोग्यदायी पौष्टिक आहार घ्यावा व फळाचे सेवन ऋतू नुसार करावे याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेया सुरडी व ऋतुजा पाटील या विद्यार्थिनींनी केले प्राध्यापक सुषमा भोसले यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!