ताज्या घडामोडी

व्हीपीएसचे कार्यवाह बाबा तथा डाॕ.गो.व्यं.शिंगरे यांचे निधन.

व्हीपीएसचे कार्यवाह बाबा तथा डाॕ.गो.व्यं.शिंगरे यांचे निधन.VPS functionary, Baba and Dr.Go.V.Singre, passed away.

आवाज न्यूज लोणावळा ता.२८.प्रतिनिधी.

व्हीपीएसचे कार्यवाह बाबा तथा डाॕ.गो.व्यं.शिंगरे यांचे आज पुण्यामधे आल्पशः आजाराने ( अंदाजे वय-७५ वर्षे ) यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजीनगर येथील भारत इग्लिश स्कूलमधे सायंकाळी साडेसहा वाजता ठेवण्यात येवून कै.शिंगरे यांचे पार्थिवावर सायंकाळी सात नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित आंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी , मुले , नातवंडे असा परिवार आहे.

श्री विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा , मळवली भाजे तसेच पुणे शहरात विविध शैक्षणिक संकुलात कला , वाणिज्य , विज्ञान ,मराठी व इंग्रजी आणि सेमिइंग्लिश आशा विविध विद्या शाखा कार्यरत आसून सुमारे हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पहिली ते बारावी व इंजिनियरींग आणि फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यात बाबा तथा गोवर्धन शिंगरे यांचा मोठा वाटा आहे. लोणावळा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व डी.पी.मेहता कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे चार ते सहा हजार विद्याथी शिकत आहे. सुमारे १७५ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

 

वाकसई चाळ येथे काही वर्षापूर्वी श्री विद्या प्रसारिणी सभेचे इंजिनियरींग काॕलेज सुरू करण्यात आले. त्यात डाॕ.गो.व्यं.शिंगरे तथा बाबा यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
श्री. विद्या प्रसारिणी सभेच्या बक्षीस समारंभाला तसेच सेवानिवृत्तीनिमित्त अनेक मुख्याध्यापक व प्राचार्य व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त निमित्ताने यांचे कार्यक्रमास बाबा तथा गो.व्यं .शिंगरे यांची उपस्थिती राहत. त्यांचे निधनामुळे शिंगरे परिवार व विद्या प्रसारिणी सभेमधील सर्व शिक्षक , विद्यार्थांवर शोककळा पसरली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!