ताज्या घडामोडी

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित, नवीन समर्थ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा..

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित, नवीन समर्थ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा..New Maharashtra Vidya Prasarak Mandal conducted, National Science Day was celebrated with enthusiasm in New Samarth Vidyalaya.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २८ फेब्रुवारी.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य. संजय वंजारे ,पर्यवेक्षक, रेवाप्पा शितोळे ,शारदा वाघमारे .संजय कसाबी उपस्थित होते.
सरस्वती पूजन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ,यावेळी विज्ञान विषय शिक्षिका.वंदना मराठे यांनी रमण परिणाम आणि त्याचा व्यवहारातील उपयोग याबद्दल माहिती आपल्या प्रास्ताविकातून सांगितली. ५वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगते, विज्ञान कविता तसेच इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनींनी पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे मूकनाट्य सादर केले.

 

या कार्यक्रमाचे नियोजन. ज्योती धनवट,  मीरा शेलार , सोनकांबळे, कोंडभर यांनी केले. सूत्रसंचालन समीक्षा मुंडे व साक्षी गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे प्राचार्य. वंजारे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.  प्रभा काळे यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!