ताज्या घडामोडी

बंद ही तर जनतेचीच मागणी…सुनील उर्फ मुन्ना मोरे

सामाजिक : बंद ही तर जनतेचीच मागणी…सुनील उर्फ मुन्ना मोरे.Bandh is the demand of the people…Sunil aka Munna More.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ८ मार्च.

सोमाटणे टोल प्रशासना कडून होणाऱ्या जाचक वसुलीचे निषेधार्थ बंद ही तर जनतेची मागणी आहे असे उद्गगार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे यांनी काढले आहेत.

 

वर्षानुवर्षे सोमाटणे टोल नाका येथे स्थानिक नागरिकांना टोल लागत नव्हता परंतु नवीन फास्टट्रॅक प्रणालीनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर परस्पर दरोडा पडत आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून टोल वसूल केला जात आहे . तसेच सोमाटणे फाटा येथे टोलनाक्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळे तळेगावातील नागरिकांना तासनतास वाहतुकीमध्ये अडकून पडावे लागत आहे.

या सर्वाच्या निषेधार्थ होणारा बंद म्हणजे नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे उचललेले पाऊलच आहे असे मुन्ना मोरे यांनी नमूद केले. टोल हटाव कृती समितीचा सदस्य या नात्याने माझ्याकडे अनेक नागरिक टोल प्रशासनाविरुद्ध तक्रार करून दाद मागत होते परंतु आयआरबी प्रशासन कधीही स्थानिक नागरिकांना जुमानत नाही. आयआरबी कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच आहे.

 

जसा १८५७ साली उठाव झाला तसाच उठाव करण्याची गरज आहे असं सर्वसामान्य नागरिक अनेक वेळा बोलून दाखवत होते. या टोलमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येचा त्रास सर्वच नागरिकांना होत असल्यामुळे तळेगावकर नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. नागरिक जेव्हा स्वतःहून कुठले कार्य हातात घेतात तेव्हा ते कार्य सिद्धीस जाते मग कोणी कितीही दडपशाही करो परंतु नागरिकांनी घेतलेलं कार्य हे नेहमी यशस्वी होतेच असा इतिहास आहे.

सोमाटणे येथील वाहतुकीचा त्रास अत्यंत वाढला असल्यामुळे पोलीस प्रशासनाने तो सोडवण्यासाठी पहिला प्रयत्न करावा तसेच आयआरबी कंपनीची देखील जाचक टोल वसुली बाबत कान उघडणी करावी , परंतु आयआरबी कंपनीसाठी पाय घड्या घातल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे असे मुन्ना मोरे यांनी स्पष्ट केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!