ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनानिमित्त!– स्त्रीशक्ती -स्त्री जीवन आणि स्थित्यंतर याचा धावता घेतलेला मागोवा!

महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ज्ञानज्योती फुलवल्या व त्यामुळे त्याकाळी स्त्रीची होणारी उपेक्षा हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला.डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

जागतिक महिला दिनानिमित्त!– स्त्रीशक्ती -स्त्री जीवन आणि स्थित्यंतर याचा धावता घेतलेला मागोवा!On International Women’s Day!– Feminine Power – The Running Track of Women’s Lives and Transitions!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विशेष लेख.८ मार्च.

भूतकाळात जर आपण डोकावून पाहिलं तर विविध क्षेत्रात डोंगरा एवढी माणसे निर्माण झाली. सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक ऐश्वर्याची स्पर्धा सुरू आहे त्यामुळे देवळातील देव व त्यांचे दर्शन, ज्ञान मंदिरातील शिक्षक व तेथील शिक्षण हीच त्या प्रचंड खरेदी- विक्रीची साधने झालेली आहेत.

वास्तविक शिक्षणही शहाणपणाची शिदोरी व कर्तबगारीची सनद असते. जीवनाची कृतार्थता शोधण्यासाठी शिक्षणाची मदत झाली तरच खरा माणूस आणि सुंदर राष्ट्र उभे राहतात. मित्रांनो शाश्वत सत्य आहे की त्या काळात जो समाज आगतिक झाला होता त्याच मूळ दारिद्र्यात आहे आणि त्या दारिद्र्याच मूळ अज्ञानात आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय दारिद्र्य दूर करता येणार नाही याची जाणीव म्हणून महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ज्ञानज्योती फुलवल्या व त्यामुळे त्याकाळी स्त्रीची होणारी उपेक्षा हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला.

महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नामुळे भारतातली भारतातील स्त्रिया व त्यांच्या जीवनातील स्थित्यंतर प्रगतीच्या प्रकाश वाटेवर प्रवास करता झाला. त्यासाठी या महात्म्यांना अनेक सामाजिक बहिष्कार आणि वैयक्तिक कौटुंबिक निंदा नालस्ती सहन करावी लागली तरीही बुद्धीला पटलेला हा निर्णय त्यांनी कधी बदलला नाही किंवा कधीही कच खाल्ली नाही. कारण त्याला कारणही तसंच होतं त्याकाळी समाजाची मानसिकता अनुकूल नसतानाही अपार कष्टातून प्रकाशवाटा निर्माण करणार्‍या या शिक्षण वाटेवर नंतर अनेक अतिरथी महारथी तयार झाले त्यात कर्मवीर भाऊराव पाटील आजच्या आधुनिक काळातील डॉक्टर पतंगराव कदम डॉक्टर विश्वनाथ कराड डॉक्टर. डी वाय पाटील सर्वांच नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल यांची नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होणार नाही कारण या महापुरुषांनी अद्ययावत ऐश्वर्य पूर्ण असं जीवन जगण्यापेक्षा उपेक्षितांना ज्ञान मनाने समृद्ध करावं श्रीमंत करावं ही परंपरा अनेक वर्षे चालू ठेवली आणि त्यामुळेच ही नवी पिढी ज्ञानसंपन्न झाली अनुभव संपन्न झाली.

समृद्धीच संपत्तीच नवीन पर्व सुरू झालं त्यासाठी आपण सुरुवात करू या आपल्या महान देशाची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी माजी राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील भारताच्या माजी संरक्षण मंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारामन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या भारताच्या मिसाईल वूमन टे सि थॉमसे बॅडमिंटनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन असलेली सुवर्णपदक मिळणारी पिव्ही सिंधू भारताच्या अंतराळ संशोधनात विविध प्रकल्पांची नेतृत्व करणाऱ्या इस्त्रो अभियंता एम वनिता अशी कितीतरी नावे घेता येतील त्याचं कारण असं की एकेकाळी पडद्यात राहणारी नेहमीच सशा प्रमाणे भित्री व घाबरट अशी तिची प्रतिमा होती पण आता प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी आणि कंडक्टर पासून कलेक्टर होणारी अशा सर्वच क्षेत्रात काम करणारी स्त्री आज सर्वत्र दिसत आहे. या सर्व परिवर्तनाचं श्रेय या सर्व संत- महात्म्यांना जातं हे निर्विवाद सत्य आहे ते स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

हे सर्व महानुभव काळाच्या कसोटीवर चंदनासारखी झिजलेली आणि ज्योती सारखी उजळलेली ही सर्व माणसे समाजाला गंध आणि तेवढाच अज्ञानाच्या अंधाराकडून प्रकाशाच्या वाटेवर ज्ञानाच्या ज्योती च्या माध्यमातून आणून सोडणारी हीच खरी देव माणसं होती आणि म्हणून मित्रांनो आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी या महात्म्यांना मनापासून नमस्कार करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!