ताज्या घडामोडी

मृत कृष्णा तिम्मा धोत्रे या निष्पाप चिमुकल्याचा गुढ मृत्यूच्या तपासासाठी पंढरपूर येथे वडार समाजाच्या वतीने काढलेला मुक मोर्चा.

समस्त पंढरपुर वडार समाजाच्या वतीने हजारो बंधू भगिनीं रस्त्यावर..

मृत कृष्णा तिम्मा धोत्रे या निष्पाप चिमुकल्याचा गुढ मृत्यूच्या तपासासाठी पंढरपूर येथे वडार समाजाच्या वतीने काढलेला मुक मोर्चा.

Muk Morcha in Pandharpur to investigate the mysterious death of deceased Krishna Timma Dhotre.

आवाज न्यूज : पंढरपूर वार्ताहर, २१ मार्च.

मृत कृष्णा तिम्मा धोत्रे या निष्पाप चिमुकल्याचा झालेल्या घात पाताचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावा.समस्त पंढरपुर वडार समाजाच्या वतीने हजारो नागरिक बंधू भगिनींनी केली मागणी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला केली आहे.

दि.२२/०१ २०२३ रोजी मयत कृष्णा तिम्मा धोत्रे हा अचानकपणे झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारी असणा-या सार्वजनिक गायत्र शौचालयामध्ये आढळून आला तसेच मृत कृष्णा धोत्रे याच्या शरिरातील काही अवयव देखील गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर मृत कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबियांनी वेळेत पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे धाव घेतली असता पंढरपूर शहर पोलिसांनी सदरहू घटना आकस्मीत मृत्यू झाला म्हणून नोंद घेतली, तसेच प्राथमिक शवविच्छेदनाचा अहवालदेखील जनावराने चिरफाड केलेबाबत आले असल्याने सदरहू प्रकरणाचा अदयापपर्यंत सखोल तपास पंढरपूर शहर पोलिसांनी केलेला नाही.

वास्तविक पाहता झालेली घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून तसेच त्याचे मृत शरिरावरील जखमा पाहता त्या कोणत्याही जनावराने केलेल्या नसून ते मानवी कृत्य असल्याची गोष्ट प्रामुख्याने जाणून येत आहे. असे असताना देखील पंढरपूर शहर पोलिसांनी वेळीच दखल घेणे आवश्यक असताना त्यांनी ती केली नाही.

 

वास्तविक सदरहू घटना ही लहान बालकाचा खुन केल्याची गंभीर घटना आहे ,तसेच सदरहू प्रकरण हे जादुटोणा कृत्यातून देखील केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे असताना पंढरपूर शहर पोलिस सदर घटनेची कोणतीही दखल अदयापपर्यंत घेतलेली दिसुन येत नाही. अशी माहिती, मी वडार महाराष्ट्राचाच .पंढरपूर विभागीय जिल्हाध्यक्ष. दत्ता रामचंद्र भोसले यांनी आवाज न्यूजला दिली.

मी वडार महाराष्ट्राचे प्रांतिक कार्याध्यक्ष.सुरेश धोत्रे यांनी आवाज न्यूजला दिलेली प्रतिक्रिया.

सौजन्य. प्राईम मराठी न्यूज, पंढरपूर.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!