गुढीपाडव्यानिमित्त औंढेखुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. तसेच लोणावळा येथे हिंदू समितीकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्यदिव्य शोभायाञा.
गुढीपाडव्यानिमित्त औंढेखुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.तसेच हिंदू समितीकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्यदिव्य शोभायाञा On the occasion of Gudi Padwa, Akhand Harinam week was organized at Aundekhurd. Also, a grand procession was organized by Hindu Samiti on the occasion of Gudi Padwa.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२१(प्रतिनिधी )
गुढीपाडव्यानिमित्त औंढेखुर्द येथील श्री हनुमान व श्रीराम मंदिरात ता.२२पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ता.२२रोजी ह.भ.प. दिलीप महाराज खेंगरे , भाजे यांचे प्रवचन व राञी ७ते ९ ह.भ.प.विजय महाराज आर्दड , बीड यांचे कीर्तन होईल.
ता.२३ रोजी ह.भ.प.घनश्याम महाराज पडवळ (कुरवंडे ) यांचे प्रवचन व राञी ७ ते ९ ह.भ.प. जयश्रीताई येवले , (पाचाणे ).यांचे कीर्तन होईल.
ता.२४ रोजी ह.भ.प. तुषारमहाराज दळवी , भाजे यांचे कीर्तन होईल. नंतर काल्याचा महाप्रसाद होईल.
रोज पहाटे काकडाआरती , सकाळी गाथा भजन , सायंकाळी हरिपाठ , प्रवचन व कीर्तन , राञी हरिजागर होईल.आसे औंढेखुर्द ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले. हे १४ वे वर्ष सप्ताहाचे आहे.
तसेच हिंदू समितीकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्यदिव्य शोभायाञा सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
डाॕक्टर बी.एन. पुरंदरे विद्यालयाचे मागील मैदानात प्रारंभ व वाकसईचाळ येथे समारोप होणार आहे..
असे संयोजक यांचेकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.