ताज्या घडामोडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे . या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पक्षाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करत २२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रभागात रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे .तर नवमहाराष्ट्र कॉलेज, पिंपरी गाव येथे तरुणांसाठी जॉब फेअरचे आयोजन केले जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली