ताज्या घडामोडी
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
मुंबई: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या दुपारी १ वाजता राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर घोषित करेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख १४ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल maharashtraeducation.com किंवा maharesult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.