मावळ तालुक्यात ३१ नवे कोरोना रुग्ण
कामशेत : मावळ तालुक्यात रविवारी (दि. २५) ३१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून दिवसभरात ५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. काल कोरोना मुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४७५ आहे.
शहरी भागात १३ तर ग्रामीण भागात १८ रुग्ण काल सापडले. काल तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत ०९ रुग्ण सापडले तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत ०४ रुग्ण सापडले वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत २५,६३६ वर पोचली आहे तर दिवसभरात ५४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वाकसई ४, तळेगाव दाभाडे ग्रामीण ३, मळवली ना मा. २, तर धामणे सोमाटणे शिरगाव नाणोली तर्फे चाकण दारुम्बरे, तिकोणा, सांगावडे, नायगाव व उरसे प्रत्येकी १ असे एकूण १८ रुग्ण सापडले.