ताज्या घडामोडी

बनावट चावी वापरत व गोपनीय कोड टाकून एटीएम फोडले; साडेसात लाखांची रोकड लुटली

तळेगाव : बनावट चावी वापरत आणि गोपनीय कोड टाकून एटीएम उघडून त्यातून ७ लाख ५२ हजार ३०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली आहे. तळेगाव येथील अभ्युदय बँकेच्या समोर याच बँकेच्या एटीएम मध्ये ही घटना अवघ्या चार मिनिटात घडली.

बँकेचे मॅनेजर राजू प्रभाकर कांबळे( वय ५० रा. तळेगाव दाभाडे )यांनी रविवारी (दि. २५ जुलै ) दिलेल्या फिर्यादीवरून तीन  अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २३ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. तळेगावातील अभ्युदय बँकेच्या बाहेरील बाजूस याच बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट चावी चा वापर करून एटीएम उघडले. गोपनीय कोड टाकून एटीएम मधील साडेसात लाखांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले. अवघ्या चार मिनिटात हा सर्व प्रकार घडला. तळेगाव दाभाडे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!