ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ तळेगावचा पदग्रहण सोहळा संपन्न

तळेगाव : लायन्स क्लब ऑफ तळेगावचा पदग्रहण सोहळा दि.31 जुलै रोजी हॉटेल एमराल्ड काउंटी रिसॉर्ट येथे संपन्न झाला.दीपक बळसरफांना क्लबचे अध्यक्षपद तर  गौरव शहा यांना सचिवपद तसेच  राजेंद्र झोरे यांना क्लबच्या खजिनदार पदाची शपथ देण्यात आली. लिओ क्लब ऑफ तळेगावच्या सहील जैन यांना अध्यक्षपद,सेजल ओसवाल यांना सचिवपद व सुमित जैन यांना खजिनदार पदाची शपथ द्वारका जलान यांनी दिली.

या वेळी अनेक वेगवेळ्या नवीन पर्मनंट उपक्रम जसे मावळातील अढले बुद्रुक व अढले खुर्द गावासाठी वॉटर प्युरिफायर प्लॉट, देवराई प्रकल्प, शिवण मशीन प्रकल्प, कुपोषणमुक्त मावळ, अश्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले.लायन डॉक्टर दीपक शहा यांचा प्रेरणेतून हे सर्व नवीन प्रकल्प येत्या काही दिवसात मावळ व इतर परिसरात चालू होणार आहेत.या वेळी लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ चाकण, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन व इतर क्लब चे सदस्य देखील उपस्थित होते.लायन्स क्लब ऑफ तळेगाव मध्ये नवीन 20 व लिओ क्लब मध्ये नवीन 8 जंनांना सभासद करून घेतले.

द्वारका जालान,दीपक शह व किशोर अवारे यांना सन्मानित करण्यात आले. किशोर अवरे यांनी लायन्स क्लबच्या सेवा कार्याचे मनापासून कौतुक केले. द्वारका जालान यांनी सभेला संबोधित केले व डॉक्टर शाळिग्राम भंडारी यांनी कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन राधेश्याम भंडारी व लायन रुपाली मेहता यांनी केले

मान्यवरांनी आपली मनोगते पदग्रहण समारंभात सादर केली.दोनहजार वीस -एकवीस या वर्षाच्या अध्यक्ष प्रमिला वाळुंज यांनी त्यांच्या वर्षभराच्या उपक्रमांचा आलेख- चलत चित्रातून सभेपुढे सादर केला. Covid-19 वायरसच्या प्रतिकूल काळातही त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव सभागृहाने टाळ्या वाजवून सादर केला व मान्यवरांनी त्यांचं मनापासून त्यांचं कौतुक केलं.नवीन सभासदांना शपथ देताना माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक भाई शहा यांनी 210 देशात 47000 क्लबच्या माध्यमातून पंधरा लाख सभासदांच्या कर्तृत्वातून समाजसेवा करणारी ही जगातली एकमेव अशी सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे आणि सुदैवाने आपण या संस्थेचे आता क्रियाशील सभासद झालेले आहात याचा सार्थ अभिमान आम्हा उभयतांना आहे आपल्या सर्वांच्याच सक्षम सहकार्यातून मानवतेची अक्षरलेणी कोरण्याच काम आपण करणार आहोत या शब्दात आपलं मनोगत प्रकट केले.

नवीन लायन सभासदांचा दीपकभाई यांनी आपल्या मनोगतातून उत्साह वाढवला .माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन- प्रसिद्ध लेखक- वक्ते  द्वारका जालान यांनी अत्यंत खुसखुशीत विनोद आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं. समाज सेवा करताना आपण समय -सेवा- संपत्ती यापैकी एक किंवा या वरील तीनही गोष्टी समाजकल्याणासाठी देऊ शकता, कारण ही देण्याची संधी आपल्याला या संघटनेमार्फत मिळते. भाषणाच्या शेवटी या संधीच आपण सोनं करावं ही अपेक्षा  सदस्यांकडून द्वारका जालान यांनी अपेक्षा केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!