ताज्या घडामोडी

एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुसासह एकास अटक : पुणे ग्रामीण एलसीबीची कामगिरी

वडगाव : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने वडगाव मावळ येथून एका फरार आरोपीस एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे.

कुणाल बाबाजी हरपुडे (वय १८) रा. ढोरे वाडा, मोरे चौक, वडगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फरार आरोपी कुणाल हा वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलाव लगत असलेल्या मोकळ्या मैदानात आला असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली.त्याच्या संशयास्पद हालचाली वरून त्यास अटक केली असता त्याच्याकडून विनापरवाना व बेकायदेशीर एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,१०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पो. हवा. प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचित, पो. काॅ. प्राण येवले, बाळासाहेब येवले, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!