ताज्या घडामोडी

जनसेवा विकास समितीचे आवाहनाला तळेगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे : कोकणासह राज्यातील अनेक भागात पूर आला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका कोकणला बसला आहे. परिणामी अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तळेगांव दाभाडे शहरातील नागरिकांनी पुढे यावे व जनसेवा थाळी, मराठा क्रांती चौक, तळेगाव स्टेशन येथे शक्य असेल ती मदत जमा करावी. कपडे, ब्लॅंकेट, चादरी, पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ, टूथ पेस्ट, पिण्याचे पाण्याच्या बाटल्या या स्वरूपात नागरिक मदत करू शकतात,  असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले  होते. आज या आवाहनाला तळेगावकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
आज सायंकाळ पर्यंत जमा झालेले साहित्य वेगवेगळ्या वाहनांमध्ये भरून रवाना करण्या आले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, जागृत वाचक कट्ट्याचे सदस्य,यांच्यासह जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, अनिल पवार, मुन्ना जाधव, सतीश ढेंबे, कल्पेश भगत तसेच समितीचे नगरसेवक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वेगवेगळ्या वाहनांमध्ये भरून ही मदत रवाना करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!