ताज्या घडामोडी

खराब झालेल्या रस्त्यांची जनसेवा विकास समितीच्या वतीने दुरुस्ती करणार – सुलोचना आवारे

तळेगाव : स्टेशन भागातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी जनसेवा विकास समिती करणार असल्याचे जेष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे यांनी जाहीर केले. रस्ता दुरुस्ती करणाचा शुभारंभ हिंदमाता रस्त्यावर काका हालवाई स्वीट ते स्वप्न नगरी कॉर्नर पर्यंत करण्यासाठीचे पूजन सुलोचनाताई आवारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पावसामुळे हिंदमाता रस्ता खराब झाला असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैर सोय होत होती. नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करूनही दखल न घेतल्याने जनसेवा विकास समिती सदर हिंदमाता रस्त्याचे दुरूस्ती व डागडुजी करण करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी नमूद केले.

नगर प्रशासनाने भुयारी गटार व भुयारी पाणी योजने साठी अनेक ठिकाणी रस्ते खणून ठेवल्याने ऐन पावसाळ्यात चिखलाचा गाळ तयार होत असल्याने जेष्ठ नागरिकांची , व वाहन चालकांची तसेच महिलांची गैर सोय होत असल्याने खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डागडुजीकरण करणार असल्याचे नगर सेवक रोहित लांघे यांनी स्पष्ट केले.

डागडुजी निमित्त हिंदमाता मार्ग सहा ऑगस्ट व सात ऑगस्ट रोजी कामा निमित्त बंद असणार आहे. हिंद माता रस्त्यालगत दाभाडे कुटूंबीयांची जागा असल्याने रस्त्यात जाणाऱ्या जागेचा मोबदला लवकरात लवकर मिळावा असे गुलाबराव दाभाडे यांनी या वेळी सांगितले. दाभाडे कुटूंबीयांच्या सहकार्यामुळे सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होत असल्याचे विरोधीपक्ष नेता गणेश काकडे यांनी स्पष्ट केले.

हिंदमाता रस्त्याचे दुरुस्तीचे काम नारळ पूजन करून करण्यात आले.या प्रसंगी नगरसेविका सुलोचना आवारे, अनिता पवार , नगरसेवक निखिल भगत, रोहित लांघे, रवींद्र आवारे, अरुण भेगडे, समीर खांडगे , प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, सुनील पवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!