ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने भोई समाज बांधवांना मत्स्य व्यवसायासाठी जाळे भेट

वडगाव : सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून वडगाव शहरातील सर्व भोई समाज बांधवांना मत्स्य व्यवसायासाठी जाळे भेट देण्यात आले.

कोरोनाच्या काळात सर्वच व्यवसायांवर मोठे संकट ओढवल्याने अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून आता कुठेतरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. वडगाव शहरातील प्रमुख असलेल्या भोई समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि मासेमारी ही जाळे वापरूनच केली जाते. यासाठी लागणारे जाळे शहरातील सर्वच समाज बांधवांना उपलब्ध करून द्यायचे असा विचार बरेच दिवस नगराध्यक्ष ढोरे यांच्या मनामध्ये घोळत होता.

आज  नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व समाज बांधवांना मासेमारी करण्यासाठी जाळे वाटप करण्यात आले. यावेळी भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांचे विशेष आभार व्यक्त करत सन्मान केला.

या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुडे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, मा उपसरपंच बाळासाहेब दौंडे, नाना वाघवले, बंटी वाघवले आणि सर्व भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील काळात मत्स्य उद्योगाला प्रोत्साहन देऊन हा उद्योग अधिक विकसित होण्यासाठी शहरातील समाज बांधवांना मासेमारी करण्याकरिता बोटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून शासन स्तरावर नगराध्यक्ष मयुर ढोरे निस्वार्थी प्रयत्न करणार आहेत.शहराचे प्रथम नागरिक या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष ढोरे हे शहरातील वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घटकांपर्यत पोहोचण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!