ताज्या घडामोडी

वाहन चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळी कामशेत पोलिसांकडून जेरबंद

कामशेत: द्रुतगती महामार्गावर बौर गावाच्या हदीत पिस्तुलाचा धाक दाखवत कारची चोरी करणाया टोळीला कामशेत पोलिसांनी जेरबंद केले आहे.वाहन चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीला माग काढत व सापळा रचत परराज्यातून अटक करण्यात कामशेत पोलिसांना यश आले आहे.

याबाबत कामशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी प्रदीप मोरेश्वर भोंगे (वय २२) रा. सावरदरी, ता.खेड यांनी त्यांची मारुती वॅगनआर कार (नं. MH -12-NX-0095) पिस्तुलाचा धाक दाखवत चोरीस गेल्याची फिर्याद २७ जुलै रोजी दिली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना मुलचंद उर्फ मनीष मुन्ना सिंग (वय २२) रा. ओगरपूर ता.हसनपूर,जि.अमरोहा उत्तर प्रदेश, निखिल सुरेंदर शर्मा(वय२१)रा.अशोकनगर सादरा यास दिल्ली येथून, तर आरोपी सोरन बाबुराम सिंह (वय२५)रा.ओगरपूर,उत्तरप्रदेश यास राजकोट, गुजरात येथून सापळा रचत अटक करण्यात आली तसेच आरोपी विशाल सिंह (रा. मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे .आरोपींकडून मोबाईल फोन , चोरीची कार असा एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आरोपी विष्णू बब्रुवान एरंडे (वय २३) रा. कुन्हाळे ता. उमरगा जि. उस्मानाबाद  आरोपी विशाल सिंह यांने गुन्हा करण्यासाठी दिल्ली व मध्य प्रदेशातून बोलावून घेतले .तसेच त्यांची राहण्याची सोय म्हाळुंगे, चाकण येथे एका लॉजवर केली. आरोपीने या सर्वांसोबत लुटीचा कट रचला असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीची १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पो.ना. एच. बी. माने, एम. व्ही.धेंडे ,पो.कॉ.भिसे यांच्या पथकाने शिताफीने कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!