ताज्या घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चा इंदोरी सोमाटणे जिल्हा परिषद गट अध्यक्ष पदी ऋतुराज काशिद

इंदोरी : भारतीय जनता युवा मोर्चा (युवा वॉरियर)  इंदोरी सोमाटणे जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्ष पदी ऋतुराज प्रदीप  काशिद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशजी भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा (युवा वॉरियर) जिल्हा अध्यक्ष संस्कार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे. जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन अण्णासाहेब मराठे, नवनियुक्त सभापती ज्योती  शिंदे, मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.

यावेळी मा. मावळ तालुका अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, इंदोरी शहर अध्यक्ष जगन्नाथ शेवकर, जेष्ठ पत्रकार बबन भसे गुरुजी, माजी  सरपंच संदीप काशिद पाटील, युवा मोर्चा युवा वॉरियर जिल्हा अध्यक्ष संस्कार चव्हाण, युवा अध्यक्ष संदीप नाटक, मनोहरजी भेगडे, उपसरपंच योगेश शिंदे , इंदोरी ग्रामपंचायत सदस्य कांचन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संगीता राऊत, मनीषा शेवकर, निवृत्ती हिंगे, दीपक राऊत, संदीप ढोरे, नितीन शिंदे, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!