ताज्या घडामोडी

खंडाळा येथे शिवसेनेच्यावतीने मोफत रूग्णवाहिका वर्षपूर्तीनिमित्त वृक्षारोपण

लोणावळा : खंडाळा येथे शिवसेनेच्यावतीने मोफत रूग्णवाहिका वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.या मोफत रूग्णसेवेसाठी रूग्णवाहिका वर्षपूर्ती निमित्त तिचे पूजन व वृक्षारोपण ता.१५ ऑगस्ट  रोजी करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे , शिवसेना नेते पर्यावरण व पर्यटनमंञी आदित्य ठाकरे, राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्यातून शिवसेना पुणे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे संचलित मोफत रुग्णवाहिका सेवा एक वर्ष पूर्ण झाले.

मोफत रुग्णवाहिका सेवेचे व्रत देशात कोविडचे भयंकर संकट लोकांसमोर असताना लोणावळा व परिसरामध्ये लोकार्पण माननीय तहसीलदार मावळ यांच्या हस्ते करण्यात आले . गेली वर्षभर अविरत समाजाशी एकरूप होऊन रुग्णसेवा मोफत देण्यात आली. या सहकार्यात्मक रुग्णसेवेच्या वर्षपूर्ती निमित्त आज खंडाळा येथे रुग्णवाहिकेचे पूजन व वृक्षारोपण मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले .

या प्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , सामाजिक कार्यकर्ते भानुदास चांदगुडे, दिलीप सातारकर, दत्ता दळवी, डॉ. प्रियांका खराडे, श्याम बाबू वाल्मिकी, सचिन वाळके, संतोष पवार, गजानन मातेरे, राजू सातारकर, रमेश पवार, रोहित पांढरे, भावेश खराडे,अनिल कदम आदी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!