ताज्या घडामोडी

बोरज येथे दुग्धव्यवसायिक दत्ताञेय गाडे यांचे निधन

लोणावळा : बोरज गावातील दुग्धव्यवसायिक व प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय केशव गाडे ( वय-६२) यांचे मंगळवारी ता.१४ गणपती गौरीविसर्जन कार्यक्रमानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , एक विवाहित मुलगा , चार विवाहित मुली , सून , जावई , नातवंडे असा परिवार आहे.

बोरज गावातील संगीत रंगीत भजनी भारूडाचे मुख्य कलाकार म्हणून व श्री हनुमान ढोल ताशा मंडळांच्या कार्यात त्यांचा पुढाकार असे.गणपती विसर्जन मिरवणूक नंतर ही दुःखद घटना घडल्याने पाटण , बोरज गावावर शोककळा पसरली.त्यांचे पार्थिवावर राञी साडेनऊला बोरजचे स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष केदारी यांनी श्रध्दांजली वाहिली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!