ताज्या घडामोडी

औंढे ते देवले चिखलमय रस्त्यावर मोठमोठे दगडगोटे टाकल्याने वाहनचालकांचे होतात हाल

लोणावळा : औंढे ते देवले या आतिशय वर्दळीच्या सर्वीस रस्त्यावर चिखल झाल्यनंतर येथे मोठमोठे दगडगोटे टाकल्याने वाहनचालकांना कसरत करीत जा ये करावी लागते .या दोन अडीच किलोमीटर रस्त्यावर आमदार , जिल्हापरिषद सदस्या , पंचायत समिती सदस्या यांनी तातडीने लक्ष घालावे , अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

या रस्त्यावर मोठमोठे दगडगोटे टाकले आहेत,त्यावरून मोटारसायकल घसरत आहेत,आपघात होत आहेत. या दगडगोटे असलेल्या रस्त्यावर बारीक खडी टाकून तसेच पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरण करावे किंवा काँक्रीटीकरण रस्ता करावा अशी मागणी देवले व औंढे , औंढोली , मळवली , पाटण , बोरज , कुसगाव , भाजे, सदापूरचे , डोंगरगाव येथील वाहनचालक करीत आहेत.

या रस्त्याने रोज शेकडो वाहनचालक जा – ये करतात. वाहनचालकांना सोयीचे होईल ,नागरिकांसाठी चालण्यायोग्य रस्ता होईल,याची काळजी सार्वजनिक बांधकाम खाते घेईल का ?असा प्रश्न भाजे विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश केदारी ,भाजेचे माजी सरपंच आरूण काळे, औंढे चे माजी उपसरपंच संतोष खराडे आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!