महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्ञी जयंती वेहेरगाव ग्रूपग्रामपंचायतच्या वतीने साजरी
लोणावळा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्ञी यांच्या जयंतीनिमित्त वेहेरगाव दहिवली ग्रूपग्रामपंचायतच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.
सरपंच अर्चना देवकर यांचेवतीने उद्योजक संदीप देवकर व उद्योजक मोरेश्वर पडवळ यांचे हस्ते महापुरूषांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगांव-दहिवलीच्या वतीने राष्ट्रपिता महात्माजी गांधी व लालबहादूरजी शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साधेपणाने साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त पोलीस पाटील अनिल पडवळ , ग्रामपंचायत सदस्य राजूशेठ देवकर , अनिल गायकवाड , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेरगांव मुख्याध्यापक श्री.डोंबेसर , सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड , तसेच ग्रामस्थ सुभाष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.