रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) लोणावळा शहरच्या वतीने काल (3 ऑक्टोबर) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ६४ वा वर्धापन दिन कुमार रिसॉर्ट लोणावळा येते उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी भुषविले. कार्यक्रमाचे नियोजन मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव , लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के व युवक अध्यक्ष राजू देसाई यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड यांनी पक्षाच्या स्थापने विषयीच्या आठवणी जागृत केल्या.तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात सुर्यकांत वाघमारे यांनी रिपब्लिकन पार्टीच्या प्रताम अध्यक्ष बॅरिस्टर एन.शिहवराजन व दादासाहेब गायकवाड यांना वंदन करून पक्षाची वाटचाल तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारताभर कसे पोचवत आहेत याविषयी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय अडसुळे,संघटक धमारक्षित जाधव,महिला अध्यक्ष यमुना साळवे,लोणावळा नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक दिलीपजी दामोदरे,मालां बनसोडे, विजय देसाई,सिद्धार्थ कदम,जयराम कदम,महिंद्रा देसाई,चंद्रकांत कांबळे,बापू यादव,जालिंदर शिंदे,सिद्धार्थ चौरे,मिसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.