ताज्या घडामोडी

शाळेची घंटा वाजली ; वर्ग पुन्हा गजबजले

लोणावळा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या तालुक्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेतील वर्ग विद्यार्थ्यांनी गजबजले आहेत.

कोरोनाची कमी होणारी आकडेवारी लक्षात घेत निर्बंध शिथिल करत राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला. असे असले तरी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

असे आहेत नियम-

● शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी असणे आवश्यक

●विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त असल्यास एक दिवसआड सुरू राहतील

●एका दिवशी पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनाच प्रवेश

●एका बाकावर एकच विद्यार्थी

●सोशल डिस्टंसिंगच पालन आवश्यक

●मास्क व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!