ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली
पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, तालुक्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या पर्यटनस्थळांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी ही स्थळे खुली झाली आहेत.
या पर्यटन स्थळांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर covid-19 प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत देशमुख यांनी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना नियम शिथिल करण्याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मंगळवार (दि. 12 ऑक्टोबर) पासून पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली होतील.
सरकारच्या या निर्णयामुळे या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक, दुकानदार, टूरिस्ट व्यवसायिक, पर्यटक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.