ताज्या घडामोडी

बजरंग दल तळेगावच्या वतीने नवरात्रीत श्री दुर्गामाता दौड निमित्ताने नवचंडी याग

तळेगाव : विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव प्रखंड च्या वतीने नवरात्रीच्या निमित्त आज रविवारी समस्त तळेगावातील नागरिकांच्या कल्याणाकरता श्री नवचंडी याग भोई आळी येथील दुर्गा माता मंदिरात  आयोजित करण्यात आला.

बजरंग दल मावळ प्रखंडचे अध्यक्ष   संतोष भेगडे पाटिल यांच्या संकल्पनेतून गेल्या 21 वर्षांपासून तळेगाव शहरात श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने याही वर्षी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव शहरातील विविध भागातुन दौड जाते. रोज एकेक परिसरातून रोज पहाटे सहा वाजता दौडला सुरुवात होते. परिसरातील एका मंदिरापासून दुसर्‍या मंदिरापर्यंत देवी-देवतांच्या महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या जयघोष करत दौड पुढे जाते.

नागरिक आपल्या घरापुढे रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करुन, ध्वजाला ओवाळणी करून दौडचे स्वागत करतात. मंदिरात आरती करून तिचा समारोप केला जातो.

यावेळी दसरा विजयादशमीच्या दिवशी शिवकालीन खंडोबा मंदिर येथे पारंपारिक शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमात कपिल देवाडिगा (मंत्री तळेगाव प्रखंड विश्व हिंदू परिषद) ओमकार भेगडे संयोजक बजरंग दल अक्षय कोडीतकर, आकाश ठोंबरे, प्रणव दाभाडे आणि सर्व बजरंगीनी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!