ताज्या घडामोडी

शिव जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने येलघोल येथे रक्तदान शिबिर

पवनानगर : येथील शिव जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नवरात्र महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात 25 पिशव्या रक्त संकलित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे खजिनदार प्रदीप घारे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. यामुळे सामाजिक भान जपत मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी मावळ तालुका माजी सभापती निकिता घोटकुले, येलघोलचे सरपंच जयवंत घारे, शांताराम भरणे, नामदेव भिलारे, चंद्रशेखर कोंगे उपस्थित होते

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!