ताज्या घडामोडी

नवलाख उंब्रेमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम

मावळ : येथील नवलाख उंब्रेमध्ये  निवृत्तीभाऊ शेटे युवा मंचच्या वतीने शारदेय नवरात्रोत्सव वउपसरपंच राहुलभाऊ शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि.11 ऑक्टोबर) रोजी गावातील सर्व महिला भगिनींसाठी खेळ ‘रंगला पैठणी’चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,मावळ भाजप अध्यक्ष रविंद्र भेगडे,पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके ,मा.सभापती निवृत्ती शेटे ,पंचायत समिती उपसभापती दत्ता शेवाळे,मा.उपसभापती शांताराम कदम,युवा नेते देवाभाऊ गायकवाड,सुनिल चव्हाण गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत गावातील सर्व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना   स्कूटी , मानाची पैठणी , फ्रीज , वॉशिंग मशिन,  पिठाची गिरणी बक्षीस  देण्यात आली.  तसेच उत्तेजनार्थ ५० महिलांसाठी साड्या व प्रश्नमंजुषा कार्यक्रमात अचूक उत्तर देणाऱ्या 20 स्पर्धकांस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

विजेत्या स्पर्धेकांची नावे  –

प्रथम क्रमांक – कुंदा दत्तात्रय दळवी
द्वितीय क्रमांक – सुरेखा सोमनाथ गायकवाड
तृतीय क्रमांक – मोनिका सागर शेटे
चतुर्थ क्रमांक – सीमा सुभाष कदम

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!