ताज्या घडामोडी

मळवलीच्या उपसरपंचपदी सोनल तिकोणे बिनविरोध

 लोणावळा :  मळवलीच्या उपसरपंचपदी सोनल गणेश तिकोणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माजी उपसरपंच हलिमा इनामदार यांनी पदाचा राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच आनिसा शेख यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी फक्त एकच आर्ज आल्याने सौनल तिकोणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामसेविका पूनम सूर्यवंशी यांनी यावेळी सभेचे कामकाज पाहिले.

यावेळी सदस्या लक्ष्मी खराडे, सुमन वाघमारे , सदस्य सुनिल दळवी, अनिल कांबळे , गणेश ढाकोळ , आस्लम शेख आदी उपस्थित होते.

निवडणुकीनंतर उपसरपंच तिकोणे यांचे माजी पंचायत समिती सदस्य , राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम काशिकर , पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत ,माजी सदस्य संतोष राऊत ,खरेदी विक्री संघ माजी चेआरमन बाळासाहेब भानुसघरे , कार्लाचे उपसरपंच किरण हुलावळे , तसेच सामाजिक युवक कार्यकर्ते देवाभाऊ गायकवाड , अमोल केदारी , काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड तसेच नगरसेवक भरत हारपुडे यांनी अभिनंदन केले.

यावेळी माजी सरपंच उस्मान इनामदार , इम्रान इनामदार , विकास तिकोणे , प्रविण काकडे, शशिकांत ढगे यांनी शुभेच्छा दिल्या .तसेच खोंडगेवाडीतील कार्यकर्ते मारूती राक्षे, संदिप वाघमारे,सुनिल भिलारे आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कडू आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!