ताज्या घडामोडी

स्टेशन भागातून जाणारी अवजड वाहने वडगाव MIDC मार्गाने सोडा – भाजपा

चौकामधून पार्किंगसाठी सम - विषम व्यवस्था करावी

तळेगाव :  येथील स्टेशन भागातील यशवंत नगर,शिवाजी चौक,मार्गे जाणारी अवजड वाहने वडगाव फाटा MIDC मार्गाने सोडण्यात यावीत.तसेच मराठा क्रांती चौक ते शिवाजी चौक रस्त्यावर पार्कींग सम-विषम व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी  भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्याकडे  निवेदनाव्दारे करण्यात आली.

यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन या विषयावर तोडगा काढण्यात येईल व पार्कींग व्यवस्था सम-विषम करण्याचे नियोजन लवकरच केले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी  सतिष दिघे यांनी दिले.

यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,गटनेते अरुण भेगडे पाटील,नगरसेविका शोभाताई भेगडे,माजी नगरसेवक सचिन टकले,सरचिटणीस रविंद्र साबळे,विनायक भेगडे,शोभाताई परदेशी,कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे,कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे,उपाध्यक्ष सुधीर खांबेटे,हिम्मतभाई पुरोहित,माजी सरचिटणीस  समीर भेगडे,ओबीसी मोर्चा सरचिटणीस दिपक खोंड हे उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!