ताज्या घडामोडी

ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती कुणी हिरावून वा चोरून घेवू शकत नाही : दत्ताञेय पाळेकर

 

लोणावळा : ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती कुणी हिरावून वा चोरून घेवू शकत नाही. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे  लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या स्थापनेसाठी पी.डी.पवार,अॕड.बापूसाहेब भोंडे आदींनी परिश्रम घेतल्याने २२ मुलांना घेवून सुरू केलेल्या संस्थेत आज बाराशे ते दीड हजार विद्यार्थी आहेत असे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्ताञेय पाळेकर म्हणाले .

प्रथम वर्ष वाणिज्य व कला शाखेत प्रवेशासाठी येणारे विद्यार्थी व मागे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आकड्यात चौपट तफावत आहे. सन २००९ व १० मधे शास्ञ शाखा सुरू झाली.पुढील वर्षी अकरावी पासून आय टी सुरू करणार आसून करियर मार्गदर्शनासाठी येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहे असे पाळेकर पुढे म्हणाले.

 

मनशक्ती केंद्रातर्फे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डाॕ.बी.एन.पुरंदरे कला , श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता वाणिज्य व एस.ए.मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय , वलवण येथे विद्यार्थ्यांना पुस्तके मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्थ प्रमोद शिंदे यांचे हस्ते व प्रमुख पाहुणे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्ताञेय पाळेकर आणि विश्वस्त निलीमा खिरे यांचे हस्ते व प्राचार्य डाॕ.बी.एन.पवार यांचे उपस्थितीमधे प्रदान करण्यात आली.

यावेळी मनशक्तीचे विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, गिरीश कुलकर्णी व निवासी साधक आदी उपस्थित होते. मनशक्ती चे श्री.शिंदे म्हणाले , महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मनशक्ती तर्फे ही अल्पशी दिवाळीनिमित्त पुस्तके भेट देण्यात येत आसून याचा आम्हाला आनंद वाटतो.

यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त अॕड.खिरे म्हणाल्या , एखाद्या वकीलाची लायब्ररी किती मोठी यावरून त्यांचा आभ्यास किती हे ठरवले जाते. तसेच डाँक्टरचीही लायब्ररी महत्त्वाची आहे.विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी संदर्भ ग्रंथाच्या अभ्यासातून शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधली पाहिजे. सुधा मुर्ती तसेच समर्थ रामदास यांचा समास असलेला दासबोध प्रत्येकाने वाचायला हवा असेही त्या म्हणाल्या .

यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा.श्री.सलवदे सर यांनी करून दिला. मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलीफा यावेळी उपस्थित होते. सूञसंचालन प्रा.संंजय साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम प्रा.धनराज पाटील, डाॕ.निलेश काळे आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.सविता पाटोळे यांनी घेतले. आभार प्रा.पाटोळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!