ताज्या घडामोडी

आमदार सुनिल भुसारा यांच्या वतीने तालुकाध्यक्षांना बोलेरो वाहने भेट

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते वितरण

बारामती  : विक्रमगडचे आमदार व पालघरचे जिल्हाध्यक्ष सुनिल चंद्रकांत भुसारा  यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या तालुकाध्यक्षांना स्वखर्चाने 5 बोलेरो वाहनांचे वितरण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार  यांच्या हस्ते बारामती येथे  केले.

आमदार व जिल्हाध्यक्ष  चंद्रकांत भुसारा  यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मजबुत बांधणीसाठी पक्षासाठी धावणाऱ्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहनाअभावी गैरसोय होऊ नये म्हणून स्वखर्चाने अनुक्रमे ५ तालुकाध्यक्षांना नवीन बोलेरो निओ  वाहने भेट दिली.

भुसारा यांच्या या निर्णयाचे शरद पवार, सुप्रिया सुळे  अजित पवार, रोहित पवार यांनी तोंडभरुन कौतुक केले. वैयक्तिक स्वखर्चातुन पक्षाच्या तालुकाध्यक्षांना पक्षाच्या कामासाठी वाहन उपलब्ध करुन देणारा राज्यातील पहिला जिल्हाध्यक्ष असा मानही भुसारा यांना मिळाला आहे.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद अण्णा कोठेकर, मोखाडा तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी,विद्यार्थी शहराध्यक्ष तनवीर तांबोळी,बंधू कैलासजी भुसारा आदि पदाधिकारी यांच्या ताब्यात प्रातिनिधिक स्वरुपाच्या चाव्या देण्यात आल्या.

सध्या या 2 बोलेरो प्राप्त झाल्या असून लवकरच उर्वरित 3 वाहने ताब्यात आल्यानंतर याचेही वाटप होणार आहे. तालुकाध्यक्षांना अशी वाहने देणार असल्याचे भुसारा यांनी या आधी अनेकदा पक्षाच्या बैठकांत सांगितले होते हे आश्वासन त्यानी कृतीत आणले.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!