ताज्या घडामोडी
भाऊबीजेची ओवाळणी द्या ; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
तळेगाव : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वाढत चाललेल्या महागाईला आवर घालत खाद्यतेल, डाळ, गॅस सिलेंडर यांच्या किमतीत 50 टक्के सवलत देऊन भाऊबीजेची ओवाळणी द्यावी अशी मागणी केली आहे.
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी प्रतिनिधी तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्र जगनाडे यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे
यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका संगीता शेळके उपस्थित होत्या.