ताज्या घडामोडी

लोणावळ्यात आज विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोणावळा : शहर विकास आराखड्यातील गवळीवाडा आरक्षण क्रमांक 32 येथील क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा आज मंगळवार (9 नोव्हेंबर) रोजी 5:30 वाजता करण्यात येणार आहे.

लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते व गवळीवाडा विभागाच्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा पार पडेल.

तसेच मुनीर हॉटेल शेजारील पांगोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम, कुमार रिसॉर्ट भांगरवाडी दरम्यान रस्ता सुधारणे व सुशोभीकरण वलवण गावातील व्यायाम शाळा या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नगरसेविका पूजा गायकवाड, रचना सिनकर, बिंद्रा गणात्रा, सुधिर शिर्के, जयश्री आहेर, सेजल परमार, मंदा सोनवणे यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व शहरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!