ताज्या घडामोडी
भांगरवाडीतील रेल्वे गेट राहणार तीन दिवसांसाठी बंद
लोणावळा : भांगरवाडी येथील गेट क्रमांक 32 (किमी 128/ 600-700) हे मंगळवार (9 नोव्हेंबर) पासून गुरुवार (11 नोव्हेंबर) पर्यंत ओव्हरहॉलींगच्या कामासाठी बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे भांगरवाडीमधून नांगरगावला जाण्यासाठी रेल्वे गेटचा वापर करणार्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.