ताज्या घडामोडी

श्री डोळसनाथ पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने दीपोस्तवात ५१०० दिव्यांची आरास

तळेगाव : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त गुरुवार( दिनांक १८ नोव्हेंबर)  रोजी सायंकाळी ६.३० वा श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती.

जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात ” एक दिवा मांगल्याचा” मावळ प्रांती जपला शिवबाच्या आठवणींचा ठेवा ..! सारे मिळूनी आज पुन्हा उजळू मांगल्याचा दिवा..!!” या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल ५ हजार १०० आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्य सभामंडपात कोल्हापूर महालक्ष्मी देवीची रांगोळी , महिला सशक्तीकरण, छत्रपती शिवाजी महाराज, मावळ तालुका कोरोना लसीकरण मोहीम, व्यायामाचे महत्व – निरोगी शरीर हाच खरा दागिना, हरितपृथ्वी, ऑनलाईन शाळा व मुले , वाचन संस्कृती, रक्तदान- श्रेष्ठदान अश्या विविध सामाजिक रांगोळ्यांद्वारे सामाजिकतेचा संदेश देण्यात आला.

त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुंन दिले या अनुषंगाने दरवर्षी दिपोस्तव साजरा करण्यात येतो.

मान्यवरांचे स्वागत संस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले.दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन, श्री डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, मा. नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नगरसेविका मंगलताई भेगडे, हेमलताताई खळदे, शोभाताई भेगडे, मायाताई भेगडे, नगरसेवक अरुण माने व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्वांनी कार्यक्रमास शुभेछया दिल्या.

श्री डोळसनाथ पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे ६ वे वर्ष असून यावेळी उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, यांच्या समवेत उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, संचालक अंकुश आंबेकर, गणेश काकडे, आनंद भेगडे, दिलीप खळदे, विशाल पवार, मा. नगरसेवक चंद्रभान खळदे, अशोक काकडे, विशाल दाभाडे, ऑर्डनन्स डेपो अध्यक्ष अजित शेलार, मा.नगरसेवक यादवेंद्र खळदे, नगरसेविका, प्राची दळवी(हेंद्रे ), नंदकुमार कोतूळकर, उपाध्यक्ष राहुल पारगे, संचालक वैभव भेगडे, शंकर भेगडे, खजिनदार निलेश राक्षे, , आदी मान्यवर व तरुण ऐक्य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते, श्री डोळसनाथ पथसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन बचत प्रतिनिधी, महिला बचत गट, श्री डोळसनाथ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व तळेगावासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.

आमदार सुनील आण्णा शेळके यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.मागील ५ वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या ६ व्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्या बद्दल उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

सजावटीकरिता विशेष सहकार्य – श्री राकेश मुगल, श्री डोळसनाथ पथसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन बचत प्रतिनिधी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक अतुल राऊत यांनी केले.श्रीपती बाबा भजनी मंडळ कर्जत, रायगड यांच्या सुमधुर भक्ती – संगीत व श्री.कुलकर्णी काका यांच्या मराठी भक्तिगीते व गाणी सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!