ताज्या घडामोडी

तळेगाव निवडणुक ; नव्या रचनेनुसार एका प्रभागाची व दोन नगरसेवकांची वाढ

तळेगाव : तळेगाव नगर परिषदेची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक प्रभाग व दोन नगरसेवकांची वाढ झाली आहे.

तळेगाव नगर परिषद ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात समाविष्ट झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेतील नगरसेवकांची संख्या 26 वरून 28 होणार असून प्रभाग संख्या 14 होणार आहे.

2016 साली झालेल्या निवडणुकीत एकूण 13 प्रभाग व 26 नगरसेवक होते. तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्याने नगरसेवकांची संख्या 27 होती.

‘ब’ वर्ग नगर परिषदेसाठी 40 हजार लोकसंख्येसाठी 25 नगरसेवक व पुढील प्रत्येक पाच हजार लोकसंख्येसाठी 1 नगरसेवक असेल. 2011 च्या जनगणनेनुसार तळेगाव शहराची लोकसंख्या 56 हजार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सदस्य संख्येत वाढ होऊन 28 होणार आहे.

सर्व पक्षांनी व इच्छुकांनी आगामी निवडणुकीसाठी व्युहरचनेला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार नागरिकांच्या गाठीभेटी घेत जनसंपर्क वाढवत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!