भगवंताने गोकुळात सवंगड्यांबरोबर विविध खेळ खेळले त्यातील हाॕकी व चेंडूफळी आज जागतिक पातळीवर पोहोचले – ह.भ.प.बबनमहाराज खेडकर
लोणावळा : भगवंताने गोकुळात सवंगड्यांबरोबर विविध खेळ खेळले त्यातील हाॕकी व चेंडूफळी आज जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. भगवंताने गायी चारायला गेल्यावर गोकुळात दहीकाला केला, सर्वांना एकसारखा वाटला, तसेच कंस , चाणूर , वज्रदंत या राक्षसांचा वध केला, असे किर्तनकार ह.भ.प. बबनमहाराज खेडकर हे कीर्तनात म्हणाले .
पाटण गावातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित काल्याचा किर्तनात बोलत होते. कोजागिरी पोर्णिमा ते ञिपुरारी पोर्णिमा असा कार्तिकी मासातील काकडाआरती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आबालवृध्द व तरूण यांचेसह महिलांनी काकडाआरतीसाठी तसेच रोजच्या कार्यक्रमानिमित्त परिश्रम घेतले.
यावेळी मृदूंगमणी निलेश साठे यांनी साथसंगत केली.गायक भाऊसाहेब मापारी ,विष्णू बुवा कोंडभर , कैलास केदारी आदींनी चालीसाठी साथ दिली. यावेळी देवाच्या चांदीच्या मुगुटासाठी भरघोस देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रविण तिकोणे , माजी सरपंच गुलाब तिकोणे , उपसरपंच , सर्व आजीमाजी सदस्य , सदस्या उपस्थित होते. सर्वांचे स्वागत माजी सदस्य दशरथ तिकोणे यांनी केले. सूञसंचालन माजी सरपंच गुलाब तिकोणे यांनी केले. पसायदान गायनाचार्य नारायण तिकोणे यांनी गायले.
यावेळी जेष्ठ वारकरी कै.तिकोणे , काकडाआरती चालक वारकरी कै. पोपटराव तिकोणे, उद्योजक कै.कुंडलीक केदारी यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. काल्याचे महाप्रसादाने सांगता झाली. सायंकाळी हारांची मिरवणूक दिडी काढून इंद्रायणीत विसर्जन करण्यात येवून सांगता झाली.