ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट ; आरोग्यमंत्र्याचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिला आहे.
डिसेंबर महिन्यात तीसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही ही लाट हलकी असेल आणि त्याचे कुठलेही गंभीर परिणाम दिसणार नाहीत असे टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात जवळपास 80 टक्के नागरिकांना कोरोनाची किमान एक लस दिली गेली आहे त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.