ताज्या घडामोडी

सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या 268 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण

 

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथे काल (28 नोव्हेंबर) रोजी सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांची 268 वी पुण्यतिथी बनेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेल्या पुण्यस्मरण पुण्यतीर्थापाशी पार पडली.

या पुण्यस्मरण सोहळ्यास राजघराण्यातील खंडेराव दाभाडे यांचे तेरावे वंशज श्रीमती सरसेनापती सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनी राजे दाभाडे सरकार, सत्यशिल राजे दाभाडे सरकार, दिव्यलेख राजे दाभाडे सरकार, इतिहास अभ्यासक ॲड. विनय दाभाडे, दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत सोपानराव दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सत्येन्द्रराजे दाभाडे सरकार म्हणाले, “छत्रपती ताराराणी, सरसेनापती उमाबाई, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महिला सशक्तिकरणाचा पाया फार वर्षापूर्वी रोवला. त्यांच्या अस्तित्वाने आपली भूमी पावन झाली आहे.” या सर्व महिलांना व उमाबाई साहेब यांना यावेळी सत्येद्रराजे दाभाडे सरकार यांनी आदरांजली वाहिली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. विनय दाभाडे म्हणाले,शिवसह्याद्री, सर सेनापती आणि रणझुंजार या महानाट्याच्या माध्यमातून आपण दिलेल्या संधीचे सोने करत इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आपला ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यावेळी बोलताना पुण्यतीर्थ आणि दुर्ग संवर्धनासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन याज्ञसेनी राजे दाभाडे सरकार यांनी केले.

चऱ्होलीमध्येही दाभाडे परिवाराकडून सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची पुण्यतिथी साजरी

28 नोव्हेंबर रोजी श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त च-होली मध्ये दाभाडे सरकार चौक या ठिकाणी उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ॲड. विनय दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री. सागर दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले व इतिहास संशोधक प्रा.डॉ.प्रमोद बोराडे म्हणाले, “श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे यांचे कार्यकर्तृत्व फक्त शौर्य या एका अंगाने न पाहता त्यांची धार्मिकता, शिस्तबद्धपना, उत्कृष्ठ नियोजन, जातीय सलोखा, शिक्षण प्रेम अशा अनेकांगानी त्यांचे चरित्र पाहिले तर खरा आणि वस्तुनिष्ठ इतिहास समोर येतो. हिन्दुस्तान प्रसिद्ध राजवंश असलेला दाभाडे घराना एक सत्य आणी आदर्शवादी वर्तनाने कायम जगल्याने छ्त्रपती शिवाजी महाराजांपासुन शाहु महाराजांपर्यंत सर्वांच्या अगदी विश्वासु आणी आप्त अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आजच्या नव्या पिढीने त्यांचा फक्त पूर्वगौरव न करता समकालातील त्यांची नैतिक मूल्य आज आत्मसात करणे अभिप्रेत आहे.”

यावेळी सचिन दाभाडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती दिली आशा विद्यमान नगरसेविका विनय तापकीर, नगरसेवक अजित  बुर्ड, भोसरी विधानसभा मनसे अध्यक्ष अंकुश  तापकीर, शिवसेना उपशहर प्रमुख ॲड. कुणाल किसनराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ऋषिकेश तापकीर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकडो मंडळी उपस्थित होते

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!