ताज्या घडामोडी

तळेगावात गुरुवारी प्रभाग क्रमांक 3 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

तळेगाव : तळेगाव येथील प्रभाग क्रमांक 3 मधील विविधि विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण  सोहळा गुरूवार (3 डिसेंबर ) रोजी पार पडणार आहे.

या सोहळ्यात सिमको कॉलनीत उद्यानाचे भूमिपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तसेच वनश्री नगर येथील श्रीरंग कलानिकेतन मधील लहान मुलांसाठी खेळणी यांचे लोकार्पण करण्यात येईल.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल अशी माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी दिली. काकडे यांच्या पाठपुराव्याने ही कामे होत आहेत.

याप्रसंगी नगरसेवक गणेश खांडगे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, बांधकाम समितीचे सभापती निखील भगत, नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांघे, माजी नगरसेवक रवींद्र आवारे, नगरसेविका अनिता पवार, माजी नगरसेवक सुनील कारंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!